लोकमत ‘काव्यऋतू’चे विजयी मानकरी कोण?, पुरस्कार वितरण सोहळा १३ नोव्हेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:13 AM2017-11-09T03:13:59+5:302017-11-09T03:14:02+5:30
राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिलेल्या प्रतिभाशाली कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे.
पुणे : राज्यभरातून भरभरून प्रतिसाद दिलेल्या प्रतिभाशाली कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. लोकमतच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यऋतू स्पर्धेचे मानकरी कोण आणि पुरस्काराची माळ कोणाच्या गळ््यात पडणार याची उत्सुकता साºयांनाच लागलेली आहे.
युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप आॅफ एज्युकेशनच्या सहयोगाने ‘काव्यऋतू’ पुरस्काराचे वितरण सोहळा व कवीसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
रसिक पुणेकरांसाठी १३ नोव्हेंबरचा दिवस अनोखी काव्यपर्वणी घेऊन येणार आहे. लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यऋतू स्पर्धेचे पुरस्कार वितरण याच दिवशी होणार आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर कवींच्या उपस्थितीमध्ये काव्यउत्सवही रंगणार आहे.
मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकमतने मराठी कवींच्या अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. या आवाहनानंतर अक्षरश: राज्यभरातून कवितांचा पाऊस पडला. विशेष म्हणजे सर्व कविता आॅनलाइन मागवण्यात आलेल्या होत्या.
कवींकडून मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. दिवसागणिक मेल इनबॉक्स कवितांनी भरून वाहू लागले. तब्बल दोन हजारांहून अधिक कविता या स्पर्धेसाठी दाखल झाल्या.
पहिल्याच वर्षी राज्यभरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर कविता आल्या हेही विशेष. या कवितांचा पाऊस पडल्यानंतर त्यातून पुरस्कारप्राप्त कवितांची निवड करणे हे आव्हानच होते. त्यासाठी ‘लोकमत’ने चार मान्यवर तज्ज्ञ परीक्षकांची समिती नेमली होती. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव व डॉ. नीलिमा गुंडी यांची ही समिती होती. त्यांनी या कवितांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पाच जणांची अंतिम निवड केली आहे. या विजेत्या कवींना १३ नोव्हेंबर रोजी होणाºया कार्यक्रमात सन्मानित केले जाणार असून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे.