ऐ मेरे वतन के लोगों कोण गाणार होते?
By admin | Published: July 8, 2014 01:17 AM2014-07-08T01:17:49+5:302014-07-08T03:24:24+5:30
भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते,
Next
नांदेड : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते, यावर गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्या विधानाने पुन्हा एकदा संगीतविश्वात खळबळ उडाली आह़े यापूर्वीही आशा भोसले यांनी सराव केला होता व त्या गाणार होत्या, हा मुद्दा समोर आला होता़
नांदेड येथे आयोजित आषाढी महोत्सवात गायिका सुमनताई कल्याणपूर यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताचा माङयाकडून सराव करण्यात आला़ प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या दिवशी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समक्ष हे गीत मीच सादर करावे असे ठरल़े मात्र त्या दिवशी जे घडले तो प्रसंग माङया आयुष्यातील सर्वात वेदनादायी आह़े’
दरम्यान, संगीततज्ज्ञ डॉ़ प्रकाश कामत म्हणाले, या गीताचा आशा भोसले यांनी सराव केला होता़ त्या गाणारही होत्या़ परंतु ऐनवेळी पंतप्रधान पंडितजींसमोर होणा:या त्या सोहळ्यात लतादीदींनी गाणो सादर केल़े उपरोक्त संदर्भ आपणाला ज्ञात आह़े त्याबद्दल वाचलेही आह़े परंतु सुमनताई कल्याणपूर यांनी त्या गीताचा सराव केला, हे ऐकिवात नाही़
संगीत अभ्यासक प्रदीप भिडे संयत भूमिका मांडत म्हणाले, सुमनताईंचे म्हणणो मी चुकीचे ठरवीत नाही़ त्यांनी रियाज केलाही असेल़ परंतु आशा भोसले गाणार होत्या, हा विषय माङया वाचनातला आह़े अंतिमत: लतादीदींच्या आवाजात हे गाणो अजरामर झाले, हे सत्य आहे.
धनंजय कुलकर्णी यांनीही संगीतकार सी़रामचंद्र यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत आशा भोसले गाणार होत्या, हे सत्य असल्याचे सांगितल़े परंतु सुमनताईंचा संदर्भ पहिल्यांदाच ऐकल्याचे ते म्हणाल़े
दरम्यान, नांदेडचे संगीततज्ज्ञ विजय पाडाळकर म्हणाले, हे अजरामर गीत लताबाईंच्या आवाजात गायिले जावे, अशा कवी प्रदीप यांच्या आठवणी आहेत़ संगीतकार सी़रामचंद्र यांनी आशाबाईंकडून सराव करून घेतला होता, याचेही संदर्भ आह़े प्रत्यक्षात देशभक्तीपर अन्य गीतांपेक्षा वेगळी मांडणी असलेले हे गीत श्रोत्यांकडून कसे घेतले जाईल, याची उत्सुकता होती़ असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
पुरावा नाही
चित्रपट संगीताचे अभ्यासक अशोक उजळंबकर म्हणाले, त्याकाळी लतादीदी व सी़रामचंद्र यांचे सांगीतिक संबंध दुरावले होत़े त्याच काळात आशा भोसलेंनी ऐ मेरे वतन के लोगों.. या गाण्याचा सराव केला होता़ परंतु सुमनताईंनी जो दावा केला आहे, त्याचे ऐकीव अथवा लेखी पुरावे नाहीत़ प्रत्यक्षात कवी प्रदीप यांनी हे गाणो लतादीदींकडून गायले जावे, असे म्हटल्याच्या नोंदी आहेत, असेही त्यांनी सांगितल़े