जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:45 PM2019-07-31T12:45:01+5:302019-07-31T12:54:03+5:30

दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.

Whoever is scared, think he went to BJP, | जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देजो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्लीपावसाळ्यात आमदारांच्याच उड्या जास्त

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.

राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचेच सरकार सत्तेत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातही भाजपची हवा निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेना युती स्वत:च्या ताकदीवर पुन्हा सत्तेत येईल, असे वातावरण असताना या दोन्ही पक्षांकडून दोन्ही काँग्रेसमधील आमदारांपासून ते अगदी तिसऱ्या चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही पक्षांत घेतले जात आहे. त्यावर टिप्पणी करताना ‘जो डर गया... समझो वो भाजप में गया...!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने ‘पक्ष बदलण्याची अंतिम तारीख’ही ठरवून द्यावी, अशी सूचना एका बहाद्दराने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी ‘मेगाभरती’ करण्याचे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ देत ‘तरीच मुख्यमंत्रीसाहेब बोलले होते, आम्ही निवडणुकीपूर्वी मेगाभरती घेऊ. आम्ही येडे नोकरीची समजलो... हे तर पक्षांतर हाय..!!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. साठ वर्षांनंतर जे काँग्रेसचे झाले, ते बहुधा ही मंडळी भाजपमध्ये जाऊन त्यांची काँग्रेस करणार, अशीही भीती एकाने व्यक्त केली आहे.

  • दरवाजावर टकटक झाली.

आहेत का आमदारसाहेब घरात ?
नाही; बाहेर गेलेत.
कधी येणारेत?
येतील तासाभरात.
बरं, त्यांना सांगा, निमंत्रण द्यायला आलो होतो.
कोण आलेलं म्हणून सांगू? बघू पत्रिका.
छे छे, लग्नाचं वगैरे नाही आमंत्रण, भाजपमध्ये येण्याचं.
पण तुम्ही कोण?
हे ‘ईडी’वाले आणि मी ‘आयकर’वाला!
अहो, साहेबच तिकडं गेलेत. तुम्ही निमंत्रण द्यायला येणार कळल्यावर.
बर झालं, मग कामच झालं.

  • कमळ उगवण्यासाठी दलदल पाहिजे ना?
    दलदल तिथे काँग्रेस गवत उगवणारच!

निसर्गाचा नियम बाबा !!
दुसरं काय !!!

  • ‘राष्ट्रवादी’तील कार्यकर्त्यांच्या बायकांचा नवीन उखाणा


सोनेरी हरणाचे फताडे-फताडे पाय
आमचे हे दिसत नाहीत....
भाजपात गेले की काय?

  • कंडक्टर : तिकीट, तिकीट... कुठं जायचं...?

दोन भाजप द्या...!!

 

Web Title: Whoever is scared, think he went to BJP,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.