संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:42 PM2021-05-17T12:42:43+5:302021-05-17T12:46:01+5:30

Nawab Malik : लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे; मलिक यांची टीका

The whole country is united lets see how many people got arrested Nawab Malik covid 19 vaccines narendra modi | संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

संपूर्ण देश एकजूट, किती लोकांना अटक करताय पाहूया : नवाब मलिक 

Next
ठळक मुद्देलोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजप सरकारची कायरता आहे; मलिक यांची टीकालस परदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? : नवाब मलिक

 "परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे. लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्र सरकारची कायरता आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघूया असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे. 

"डाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस परदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्र सरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी लसी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात आहेत," असं नवाब मलिक म्हणाले. 

सर्वजण भारतमातेची लेकरं 

"मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. सर्व भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस परदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करुन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय. मोदीजी, तुम्ही किती लोकांना अटक करणार?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. 

Web Title: The whole country is united lets see how many people got arrested Nawab Malik covid 19 vaccines narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.