दारूच्या नशेत त्यानं संपवलं अख्खं कुटुंब
By admin | Published: February 9, 2017 09:40 AM2017-02-09T09:40:48+5:302017-02-09T10:32:16+5:30
सोलापुरात दारुच्या नशेत एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंब संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9 - दारुच्या नशेत एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंब संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील कोरफले येथील ही घटना आहे.
अनुरथ बरडे असे आरोपीचे नाव असून त्याने दारुच्या नशेत सुरुवातीला स्वतःची आई आणि मुलाच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला.
यानंतर त्यानं पत्नी आणि मुलीला जिवे मारण्यासाठी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवलं. या घटनेत अनुरथची आई, मुलगा आणि पत्नीचा मृत्यू झाला असून त्याची इयत्ता पाचवीत शिकणारी त्याची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे.
तिच्यावर उस्मानाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी अनुरथ बरडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.