मतांचा ‘सागर’ कुणासोबत?

By admin | Published: June 10, 2014 01:08 AM2014-06-10T01:08:23+5:302014-06-10T01:08:23+5:30

पश्‍चिममध्ये अशा स्थितीत सुधाकर देशमुखांसारखीच स्थिती मुळकांचीही होण्याची शक्यता आहे. मुळकांना मग कामठी मतदार संघाकडे त्यांचा मोर्चा वळवावा लागेल. असे झाले तर तेथे इच्छुक असलेल्या रिपाइंच्या

Who's the 'Sea' of votes? | मतांचा ‘सागर’ कुणासोबत?

मतांचा ‘सागर’ कुणासोबत?

Next

नागपूर : पश्‍चिममध्ये अशा स्थितीत सुधाकर देशमुखांसारखीच स्थिती मुळकांचीही होण्याची शक्यता आहे. मुळकांना मग कामठी मतदार संघाकडे  त्यांचा मोर्चा वळवावा लागेल. असे झाले तर तेथे इच्छुक असलेल्या रिपाइंच्या सुलेखा कुंभारेंचे काय? लोकसभा निवडणुकीत कुंभारे यांनी काँग्रेसला  पाठिंबा जाहीर केला होता. त्याबदल्यात त्यांना कामठीचे आश्‍वासन दिल्याची चर्चा आहे. मुळक यांच्या पाठीशी मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यासाठी  असलेल्या दोन्ही मतदार संघात मेघेंच्या भाजप प्रवेशामुळे पेच निर्माण झाला आहे. उपराजधानीतील दुसरा मतदार संघ हा मध्य नागपूरचा आहे.  मुस्लीम आणि हलबाबहुल असलेल्या या मतदार संघात मेघेंना मानणारा मुस्लीम वर्ग आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या मतदार संघातून  समीर मेघेंच्या नावाची चर्चा होती. येथून यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर विद्यमान आमदार विकास कुंभारेंचे काय? लोकसभा निवडणुकीत  मध्यमधूनही भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कुंभारेंची बाजू आजच भक्कम आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना डावलून मेघे पुत्राला उमेदवारी  दिल्यास भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटू शकतात. याशिवाय कुंभारे हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणुकीच्या तोंडावर या समाजाची  नाराजी पत्करणे कुठल्याही पक्षासाठी धोक्याचे ठरू शकते.
सागर मेघे यांना भाजपने विधान परिषदेवर पाठविल्यावर त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश  केला होता. त्यानंतर झालेल्या  पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा गमावली होती. याची सल आजही भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. याचे पडसादही सागरच्यासंदर्भात निर्णय  घेताना उमटू शकतात.
दरम्यान, मेघेंसोबत कोण कोण भाजपमध्ये जाणार, याकडेही आता काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या राजकारणात मेघे सर्मथक आजी-माजी नगरसेवक सक्रिय आहेत. काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असले  तरी त्यांच्या निष्ठा मेघे कुटुंबीयांवर आहे. त्यात काही मुस्लीम नगरसेवकांचाही समावेश आहे. ही मंडळी भाजपमध्ये जाणार का, याकडेही राजकीय  जाणकारांचे लक्ष लागले आहे.
एकूणच विधानसभेच्या तोंडावर झालेला मेघे पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी तोट्याचा असला तरी, भाजपसाठी तो किती फायदेशीर ठरतो, ते  निवडणुकीनंतरच कळणार आहे.  दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघे यांचा भाजप प्रवेश पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  माध्यमातूनच झाला आहे.
मेघेंना सन्मानाच्या वागणुकीसोबतच महत्त्वाची पदे देण्याचेही आश्‍वासन भाजपकडून मिळाले असून, त्यात मेघेंना राज्यपालपद तर सागर किंवा  समीरला विधानसभेची उमेदवारी आदींचा समावेश आहे. मेघेंच्या प्रभावामुळे पक्षाकडे कुणबी समाज आकर्षित होऊ शकतो, असे भाजप नेत्यांना  वाटते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Who's the 'Sea' of votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.