विखेंच्या तोंडाला कोणाचा मास्क ?

By admin | Published: September 9, 2015 12:37 AM2015-09-09T00:37:36+5:302015-09-09T00:37:36+5:30

सध्या बाळासाहेब विखेंची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते मास्क लावून बोलत असतात. त्यांच्या वयाचा मान राखत आम्ही त्यांच्याविषयी टीका करणार नाही. मात्र सध्या ते कोणत्या पक्षाचा मास्क

Whose face masks? | विखेंच्या तोंडाला कोणाचा मास्क ?

विखेंच्या तोंडाला कोणाचा मास्क ?

Next

मुंबई : सध्या बाळासाहेब विखेंची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते मास्क लावून बोलत असतात. त्यांच्या वयाचा मान राखत आम्ही त्यांच्याविषयी टीका करणार नाही. मात्र सध्या ते कोणत्या पक्षाचा मास्क लावून कोणत्या पक्षाची भूमिका मांडत आहेत हे समजून घ्यायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
विखेंनी आजवर अनेक पक्ष बदलले आहेत. १९९१ साली त्यांच्या राजकीय कर्तृत्वाची दखल घेत स्वत: राजीव गांधींनी त्यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट नाकारले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी आम्ही फार बोलणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय माध्यमांतून प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळेच राजकीय विजनवासात गेलेल्या विखेंनी प्रसिद्धीसाठीच टीका केली असावी. विखेंनी मराठवाड्यातील दुष्काळाला शरद पवार जबाबदार असल्याचा जावईशोध लावला आहे. ज्यावेळी या देशावर, राज्यावर भूकंप, दुष्काळ, पूर, गारपीट अशी नैसर्गिक संकटे आली त्या प्रत्येक आपत्तीत शरद पवार जनतेसाठी धावून आले आहेत, याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.

Web Title: Whose face masks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.