शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:31 AM2024-10-30T10:31:20+5:302024-10-30T10:31:46+5:30

महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आता स्पष्ट झाली आहे. महायुतीत भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ...

Whose Shiv Sena? Thackeray-Shinde group will clash directly in so many constituencies; Where is the battle? | शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...

शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...

महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आता स्पष्ट झाली आहे. महायुतीत भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. तर मविआमध्ये काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. अशातच शिवसेना कोणाची? या अर्धवटच राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर या विधानसभेला मिळणार आहे. 

उद्धव  ठाकरे शिवसेना गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट २८८ पैकी ४७ विधानसभा मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढणार आहेत. जागावाटपात उद्धव ठाकरेंनी बाजी मारलेली आहे. शिंदेंपेक्षा जास्तीच्या ११ जागा ठाकरे गट लढवत आहे. लोकसभेलाही ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा जास्त जागा लढविल्या होत्या. शिंदे गटापेक्षा जास्त जागा ठाकरे गटाने जिंकल्याही होत्या. परंतू, स्ट्राईक रेट शिंदेंचा चांगला होता, असा दावा करण्यात आला होता. 

आताही विधानसभेला ४७ पैकी शिंदे गट किती आणि ठाकरे गट किती जागा जिंकतो यावरून पुन्हा राजकारण रंगणार आहे. यातही स्ट्राईकरेटचा मुद्दा काढला जाणार आहे. या ४७ मतदारसंघांत ठाकरे गट मशाल आणि शिंदे गट धनुष्यबाण या पारंपरिक चिन्हावर लढणार आहे. 

हे ४७ मतदारसंघ कोणते? 

सांगोला 
शहाजी बापू पाटील (शिंदे गट) 
दीपक आबा साळुंखे (ठाकरे गट)

पाटण 
शंभूराज देसाई (शिंदे गट) 
हर्षद कदम (ठाकरे गट)

परांडा 
तानाजी सावंत (शिंदे गट) 
राहुल ज्ञानेश्वर पाटील (ठाकरे गट)

चोपडा 
चंद्रकांत सोनवणे (शिंदे गट) 
राजू तडवी (ठाकरे गट)

बुलढाणा 
संजय गायकवाड (शिंदे गट) 
जयश्री शेळके (ठाकरे गट

मेहकर 
संजय रायमुलकर (शिंदे गट) 
सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)

सिल्लोड 
अब्दुल सत्तार (शिंदे गट) 
सुरेश बनकर (ठाकरे गट)

बाळापूर 
बळीराम शिरसकर (शिंदे गट) 
नितीन देशमुख (ठाकरे गट)

पालघर 
राजेंद्र गावित (शिंदे गट)
जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

रामटेक 
आशिष जैस्वाल (शिंदे गट) 
विशाल बरबटे (ठाकरे गट)

कळमनुरी 
संतोष बांगर (शिंदे गट) 
संतोष टारफे (ठाकरे गट)

परभणी 
आनंद भरोसे (शिंदे गट) 
राहुल पाटील (ठाकरे गट)

कन्नड 
संजना जाधव (शिंदे गट) 
उदयसिंह राजपूत (ठाकरे गट)

औरंगाबाद पश्चिम 
संजय शिरसाट (शिंदे गट) 
राजू शिंदे (ठाकरे गट)

जोगेश्वरी पूर्व 
मनिषा वायकर (शिंदे गट) 
अनंत (बाळा) नर (ठाकरे गट)

पैठण 
विलास भुमरे (शिंदे गट)
दत्ता गोर्डे (ठाकरे गट)

वैजापूर 
रमेश बोरनारे (शिंदे गट) 
दिनेश परदेशी (ठाकरे गट)

नांदगाव 
सुहास कांदे (शिंदे गट) 
गणेश धात्रक (ठाकरे गट)

पालघर 
राजेंद्र गावित (शिंदे गट)
जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

बोईसर 
विलास तरे (शिंदे गट) 
विश्वास वळवी (ठाकरे गट)

भिवंडी ग्रामीण 
शांताराम मोरे (शिंदे गट) 
महादेव घाटळ (ठाकरे गट)

कल्याण पश्चिम 
विश्वनाथ भोईर (शिंदे गट) 
सचिन बासरे (ठाकरे गट)

अंबरनाथ 
बालाजी किणीकर (शिंदे गट) 
राजेश वानखेडे (ठाकरे गट)

कल्याण ग्रामीण 
राजेश मोरे (शिंदे गट) 
सुभाष भोईर (ठाकरे गट)

ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (शिंदे गट) 
नरेश मणेरा (ठाकरे गट)

कोपरी-पाचपाखाडी 
एकनाथ शिंदे (शिंदे गट) 
केदार दिघे (ठाकरे गट)

मागाठणे 
प्रकाश सुर्वे (शिंदे गट) 
उदेश पाटेकर (ठाकरे गट)

भायखळा 
यामिनी जाधव (शिंदे गट)
मनोज जामसुतकर (ठाकरे गट)

विक्रोळी
सुवर्णा करंजे (शिंदे गट)
सुनील राऊत (ठाकरे गट)

भांडुप पश्चिम 
अशोक धर्मराज पाटील (शिंदे गट)
रमेश कोरगावकर (ठाकरे गट)

दिंडोशी 
संजय निरुपम (शिंदे गट) 
सुनील प्रभू (ठाकरे गट)

अंधेरी पूर्व 
मूरजी पटेल (शिंदे गट) 
ऋतुजा लटके (ठाकरे गट)

चेंबुर 
तुकाराम काते (शिंदे गट) 
प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट)

कुर्ला 
मंगेश कुडाळकर (शिंदे गट) 
प्रविणा मोरजकर (ठाकरे गट)

माहिम
सदा सरवणकर (शिंदे गट)
महेश सावंत (ठाकरे गट)

वरळी 
मिलिंद देवरा (शिंदे गट)
आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

कर्जत 
महेंद्र थोरवे (शिंदे गट)
नितीन सावंत (ठाकरे गट)

महाड 
भरतशेठ गोगावले (शिंदे गट) 
स्नेहल जगताप (ठाकरे गट)

नेवासा 
विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे गट) 
शंकरराव गडाख (ठाकरे गट)

उस्मानाबाद 
अजित पिंगळे (शिंदे गट) 
कैलास पाटील (ठाकरे गट)

बार्शी 
राजेंद्र राऊत (शिंदे गट) 
दिलीप सोपल (ठाकरे गट)

दापोली 
योगेश कदम (शिंदे गट) 
संजय कदम (ठाकरे गट)

गुहागर 
राजेश बेंडल (शिंदे गट) 
भास्कर जाधव (ठाकरे गट)

रत्नागिरी 
उदय सामंत (शिंदे गट) 
सुरेंद्रनाथ (बाळ) माने (ठाकरे गट)

राजापूर 
किरण सामंत (शिंदे गट) 
राजन साळवी (ठाकरे गट)

कुडाळ 
नीलेश राणे (शिंदे गट) 
वैभव नाईक (ठाकरे गट)

सावंतवाडी 
दीपक केसरकर (शिंदे गट) 
राजन तेली (ठाकरे गट)

राधानगरी 
प्रकाश आबिटकर (शिंदे गट) 
के. पी. पाटील (ठाकरे गट)
 

Web Title: Whose Shiv Sena? Thackeray-Shinde group will clash directly in so many constituencies; Where is the battle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.