राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:26 IST2024-10-30T15:24:27+5:302024-10-30T15:26:05+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम-दादर मतदारसंघच का निवडला? असा प्रश्न अनेकांना आहे. यावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच भाष्य केले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही उतरला आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेमाहीम-दादर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम-दादर मतदारसंघच का निवडला? असा प्रश्न अनेकांना आहे. यावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, "मनसे नेत्यांची एक बैठक झाली होती. त्यात आपण उपस्थित नव्हतो. यावेळी नेतेमंडळी म्हणाले, सर्वांनीच निवडणूक लढायला हवी. तेथे अमित म्हणाला, प्रत्येकाने निवडणूक लढायला हवी. पक्षाने मीही निवडणूक लढेन. याच्या बातम्या आल्या. मात्र, मी तेव्हा गांभीर्याने घेतले नाही. यानंतर आपल्या एका बैठकीत समोरून काही नेते म्हणाले की, अमित ठाकरे यांना भांडुपमधून उभे करूया. यानंतर हे मी गांभीर्याने घेतले आणि मी रात्री अमितसोबत बोललो. मी त्याला विचारले की, या ज्या चर्चा सुरू आहेत, निवडणूक लढवण्यासाठी तू सेरिअस आहेस? यावर तो म्हणाला आपल्याला वाटत असेल त लढेन, नसेल वाट तर नाही लढणार. पण मला वाटते की पक्षाच्या सर्व लोकांनी निवडणूक लढायला हवी. यानंतर, भांडुपपेक्षा माहीम-दादर मतदारसंघातून निवडणूक लढवणे योग्य असल्याची चर्चेतून समोर आले." राज ठाकरे एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
माहिम सीटवर कशी आहे तयारी?
राज ठाकरे पुढे म्हणाले, यानंतर, आमचे जे नितिन सरदेसाई आहेत, मी त्यांना या जागेसाठी एक वर्षापूर्वीच तयारी करण्यास सांगितले होते. आता मलाच समजे ना की, मी तर त्यांना सांगितले आहे की, कामाला लागून जाता आणि आता याला उभे करायचे आहे. त्यांच्या सोबत काय बोलू? कारण आमचे केवळ राजकीयच नाही तर कौटुंबीक संबंधही आहेत. तर हे सर्व होता होता, सर्वांनी निर्णय घेतला की, अमितला उभे करायचे आहे आणि तेथून हे सर्व सुरू झाले.