दुसरा पती संजीव खन्नालाच का सोबत घेतले ?

By Admin | Published: August 27, 2015 01:54 AM2015-08-27T01:54:22+5:302015-08-27T01:54:22+5:30

इंद्राणी व पीटर मुखर्जी यांनी स्टार टीव्ही सोडून २००९मध्ये स्वत:ची आयएक्सएन वाहिनी सुरू केली. काही वर्षांनी ही वाहिनी त्यांनी तिसऱ्याला विकली. त्यातून आलेल्या पैशांमधून देशभरात

Why did Sanjeev Khanna take another husband? | दुसरा पती संजीव खन्नालाच का सोबत घेतले ?

दुसरा पती संजीव खन्नालाच का सोबत घेतले ?

googlenewsNext

मुंबई : इंद्राणी व पीटर मुखर्जी यांनी स्टार टीव्ही सोडून २००९मध्ये स्वत:ची आयएक्सएन वाहिनी सुरू केली. काही वर्षांनी ही वाहिनी त्यांनी तिसऱ्याला विकली. त्यातून आलेल्या पैशांमधून देशभरात बरीच मालमत्ता विकत घेतली. यापैकी मोठा वाटा शीनाच्या नावे आसाममध्ये विकत घेतलेल्या मालमत्तेचा होता. याच मालमत्तेच्या वादातून शीनाची हत्या तर झाली नाही ना, याचाही तपास खार पोलीस करीत आहेत. शीनाची हत्या करण्यासाठी इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना याला का सोबत घेतले आणि तोही या हत्याकांडात का सहभागी झाला, याचेही नेमके उत्तर अद्याप खार पोलिसांकडे नाही. इंद्राणीला संजय खन्नापासून एक मुलगी झाली. तिचे नाव विधी. ती सध्या लंडनमध्ये असते. शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या नावे असलेली मालमत्ता ही संजीवची मुलगी विधीच्या नावावर चढवून हळूहळू आपल्याकडे घेण्याचा डाव इंद्राणीच्या मनात सुरू असावा, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Why did Sanjeev Khanna take another husband?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.