'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 07:05 PM2024-08-29T19:05:46+5:302024-08-29T19:06:59+5:30

Narayan Rane news: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शिवसेनेचा इतिहास काढत राणेंनी ठाकरेंना एक सवाल केला.

'Why didn't Uddhav Thackeray speak then?', asked Narayan Rane To Shiv Sena UBT Chief | 'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास

'तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाही?', नारायणे राणेंचा सवाल, शिवसेनेचा काढला इतिहास

Narayan Rane Uddhav Thackeray News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा मुद्दा तापला आहे. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते आणि नारायण राणे-निलेश राणे आमने सामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी राणेंनी घरात घुसून मारेन, असे विधान केले. त्यावरूनही विरोधकांनी निशाणा साधला. या सगळ्यांवर आता नारायण राणेंनी भूमिका मांडली आहे.

धमकीच्या भाषेवर राणेंचे म्हणणे काय?

धमकीच्या भाषेवरून विरोधकांनी टीका केली. पण, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंचा स्वभाव आक्रमक आहे. याच मुद्द्यावर बोलताना नारायण राणे एका मुलाखतीत म्हणाले की, "आमचे देवेंद्र फडणवीस बरोबर ओळखतात. शिवसेनेत असताना धमक्या, आक्रमक होतो. तेव्हा काही बोलले नाहीत उद्धव ठाकरे. जेव्हा शिवसेना वाढवण्यासाठी हा स्वभाव उपयोगात आणत होतो, तेव्हा का नाही बोलले?", असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना केला. 

"तेव्हा हे कुठे होते? उद्धव ठाकरे तू माझ्यावर बोलू नकोस. वैभव नाईकला काय धमकी देण्याच्या लायक आहे का? त्याला कोण्यातरी वकिलाने सांगितले असेल. त्याला म्हणावं तुला धमकी देण्याची गरज नाही. मी मनात आणेल तेव्हा तसे करू शकतो", असा इशारा आमदार नारायण राणेंनी वैभव नाईक यांना दिला. 

आधी जोडले हात नंतर म्हणाले, "संजय राऊतला तो धर्मच माहिती नाही"

संजय राऊत पाहणी करण्यासाठी येणार आहेत, असा मुद्दा उपस्थित करताच नारायण राणेंनी हात जोडले आणि म्हणाले, "अरे बाबा माझी संध्याकाळ चांगली जाऊदे ना. संजय राऊत म्हणजे काय? संजय राऊतला येऊ दे. पुतळा बांधून देऊ दे. वाईट बोलणे आणि टीका करण्यापलिकडे त्याच्या आयुष्यात काहीही नाही. तो कोणाला चांगला बोलला नाही. चांगल्याला चांगले म्हणणे माणुसकीचा धर्म आहे आणि तो त्याला माहिती नाही", असे उत्तर नारायण राणेंनी दिले.

Web Title: 'Why didn't Uddhav Thackeray speak then?', asked Narayan Rane To Shiv Sena UBT Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.