हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या आंब्याला बसणार चाप, ‘कोकण हापूस’ला जीआय मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 09:44 PM2018-10-05T21:44:11+5:302018-10-05T21:55:46+5:30

वैशिष्ट्यपूर्ण रंग, गंध आणि चव यामुळे जगभरात मागणी असलेल्या कोकणात पिकणा-या हापूस आंब्याला ‘जीआय’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे.

Why a GI tag for Hapus mangoes could be no more than a case of vanity | हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या आंब्याला बसणार चाप, ‘कोकण हापूस’ला जीआय मानांकन

हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या आंब्याला बसणार चाप, ‘कोकण हापूस’ला जीआय मानांकन

Next

- मेहरून नाकाडे

रत्नागिरी : वैशिष्ट्यपूर्ण रंग, गंध आणि चव यामुळे जगभरात मागणी असलेल्या कोकणात पिकणा-या हापूस आंब्याला ‘जीआय’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे. दहा वर्षांपासून होत असलेली ही मागणी न्यायिक प्रक्रियेत अडकली होती. हापूसचे मातृस्थान कोकण असल्याच्या मुद्द्यावर आता शिक्कामोर्तब झाल्यामुळे हापूसचा भाव वाढेल, हे निश्चित झाले आहे. देवगड किंवा रत्नागिरी असे स्वतंत्र मानांकन न करता ‘कोकण हापूस’ असे मानांकन देण्यात आल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या आंबा उत्पादकांना ते फायदेशीर ठरणार आहे.

देवगड तालुका आंबा उत्पादक संघ आणि केळशी आंबा उत्पादक संघ यांच्याबरोबरच दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून ही मागणी झाली होती. मात्र या मुद्द्याबाबत काही लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे विद्यापीठाने २२ सप्टेंबर २००८ ला पाठविलेला प्रस्ताव न्यायिक प्रक्रियेत अडकला होता. अखेर न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कंट्रोलर जनरल पेटंटस् डिझाइन, ट्रेडमार्क या भारत सरकारच्या नोंदणीकृत संस्थेकडून कोकण हापूसला जीआय प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

आतापर्यंत देशातील १३८ कृषी उत्पादनांना ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. कोकणातील काजू, कोकम व चिकू या तीन उत्पादनांचा समावेश होता. कोकणातील चौथे मानांकन प्राप्त उत्पादन हापूसचा मानांकन क्रमांक १३९वा आहे. हापूसला मानांकन मिळाल्याने हॉल मार्कप्रमाणे विशेष ‘जीआय’ चा लोगो तयार करण्यात येणार आहे. हा लोगो उत्पादनांवर लावण्यात आल्याने ‘जीआय’ उत्पादन कोणते हे ग्राहकांना तत्काळ कळेल आणि त्यामुळे त्याला तसा दरही मिळेल. कोकणातील काजू, कोकम आणि चिकू यांनाही याअगोदरच जीआय मानांकन मिळाले आहे.
--------------------------
‘जीआय’ मानांकनामुळे होणारे फायदे
- कोकणच्या हापूसला जगभरात मिळणार स्वतंत्र ओळख
- मानांकनामुळे (ब्रँडनेममुळे) हापूसला मिळणार चांगला भाव
- हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या परराज्यातील आंब्याला बसणार चाप

Web Title: Why a GI tag for Hapus mangoes could be no more than a case of vanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.