दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयपीएल कशाला? हायकोर्टाचा BCCIला सवाल
By admin | Published: April 6, 2016 02:47 PM2016-04-06T14:47:52+5:302016-04-06T15:02:40+5:30
राज्यभरात भीषण दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे ्सा सवाल हायकोर्टाने बीसीसीआयला विचारला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्यभरात भीषण दुष्काळ असताना, काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेशही देण्यात आलेले असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा सल्ला दिला. दुष्काळी स्थिती असताना पाण्याचा (असा) अपव्यय योग्य नाही. तुम्ही पाणी असे वाया कसे घालवू शकता? (बीसीसीआयच्या) आयपीएलच्या सामन्यांपेक्षा राज्यातील लोक जास्त महत्त्वाचे आहेत, असेही न्यायालयाने सुनावले.
याप्रकरणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ' बीसीसीआयला होणारा पाणीपुरवठा कापल्यासच तुम्हाला (परिस्थिती) समजेल' अशी पुस्ती जोडत न्यायालयाने बीसीसीआयला खडसावले.
आयपीएलचे सामने खेळविण्यात येणाऱ्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मैदानांवरील खेळपट्यांच्या देखभालीसाठी ६० लाख लीटर पाणी वापरण्यात येईल. एकीकडे पाण्याअभावी मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशी मागणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने केली होती.
येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे.