प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचे कलम का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:54 PM2023-08-04T12:54:40+5:302023-08-04T12:54:48+5:30
...त्याच्यावर देशद्रोहाची कलमे देखील लावण्यात यावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
मुंबई : पाकिस्तानी हनीट्रॅपमध्ये अडकलेला पुण्यातील डीआरडीओ संस्थेमधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्या विरोधात केवळ ‘ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट’अंतर्गतच गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर देशद्रोहाची कलमे देखील लावण्यात यावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत या प्रकरणावर सभागृहात चर्चा होणे योग्य नाही. न्यायालयाला जर आवश्यक वाटले तर देशद्रोह किंवा इतर कोणतेही कलम लावण्याचा विचार न्यायालय करू शकते, असे नार्वेकर म्हणाले.