जो न्याय राष्ट्रवादीला, तो सुरेशदादांना का नाही?
By admin | Published: October 14, 2014 01:25 AM2014-10-14T01:25:29+5:302014-10-14T01:25:29+5:30
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर बलात्कार व खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना जामीन मिळतो,
Next
जळगाव : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर बलात्कार व खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना जामीन मिळतो, तर दुसरीकडे आमदार सुरेशदादा जैन यांच्याविरुद्ध अद्याप खटला सुरू झालेला नसतानादेखील त्यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही. जो न्याय राष्ट्रवादीच्या नेत्यांना तो सुरेशदादांना का नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े त्यांच्या या सभेने प्रचाराची सांगता झाली. उद्धव यांनी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.
उद्धव म्हणाले, सुरेशदादा यांनी कोणताही गंभीर गुन्हा केला नसताना तब्बल अडीच वर्षापासून त्यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही. तर दुसरीकडे बलात्कार व खुनाचे गुन्हे दाखल असलेले आरोपी मोकाट फिरत आहेत. पाचो:याचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ त्यांना भर चौकात उभे करून जाब विचारला पाहिजे. एवढेच नव्हेतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असतानादेखील ते बाहेर आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना जो न्याय लावता तो सुरेशदादांना का नाही? हा दुजाभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ तसेच ज्या भाजपा नेत्यांनी विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, शिवाजी कार्डिले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तेच आता त्यांच्या पक्षात आले असून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचाही उद्धव यांनी समाचार घेतला. जिल्ह्यात मी मुद्दाम आलो असून, खडसेंना धडा शिकविण्यासाठी मुक्ताईनगरात सभा घेतल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सेना-भाजपाची 25 वर्षाची युती तुटण्यास खडसे हेच कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित जाहीर सभेत केला.
पाचो:याचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांनी एका मुलीवर बलात्कार केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना जामीन मिळून ते निवडणुकीला उभे आहेत.