मुंबईत आॅनलाइन प्रवेश का नाही?
By admin | Published: July 17, 2015 12:45 AM2015-07-17T00:45:37+5:302015-07-17T00:45:37+5:30
अकराची प्रवेशाची चौथी फेरी आॅनलाइन पद्धतीने का घेत नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. तसेच याचा खुलासा करण्यासाठी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने
मुंबई : अकराची प्रवेशाची चौथी फेरी आॅनलाइन पद्धतीने का घेत नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने गुरुवारी केला. तसेच याचा
खुलासा करण्यासाठी न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठाने उद्या, शुक्रवारी शिक्षण अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोष असल्याने यात बदल करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका पुणे येथील वैशाली बाफना यांनी अॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत केली आहे. त्यावरील सुनावणीत सरकारी वकील दिनेश खैर यांनी यंदा आॅनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर चौथी विशेष फेरी घेतली जाणार असल्याचे गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली होती.
यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यात मुंबईत चौथी फेरी आॅफलाइन पद्धतीने होणार असल्याचे शासनाने न्यायालयाला सांगितले. मात्र आॅफलाइन पद्धतीने ही फेरी का घेतली जात आहे, असा सवाल न्यायालयाने केला व वरील आदेश देत ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)