शरद पवार का संतापले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:32 AM2019-07-25T11:32:23+5:302019-07-25T11:39:02+5:30
राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. तसेच तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज काही लोकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. यातून शरद पवार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- राजा माने
मुंबई - चक्क आपल्याच नावे शेतकऱ्यांची थट्टा करणारे बनावट मेसेज समाज माध्यमातून प्रसारित होत असल्याने शरद पवार संतापले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरून समाजात विष कालवू नका, असं आवाहन केले असताना आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर शरद पवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
शरद पवार यांनी या संदर्भात ट्विट केले. तसेच संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली. पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांचा मोबाइल माझ्यातर्फे मोफत रिचार्ज करून दिला जाईल, अशी अफवा व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावरून पसरत असल्याचे मला समजले. काही समाजकंटकांनी पीडित शेतकऱ्यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे.
अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असंही पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करून मी असे कृत्य करणाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करतो. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2019
राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. तसेच तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची थट्टा करणारे मॅसेज काही लोकांकडून व्हायरल करण्यात येत आहे. यातून शरद पवार यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.