मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:01 IST2025-01-03T07:00:46+5:302025-01-03T07:01:02+5:30
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.

मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. परंतु, या घटनेत माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.
वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
- ‘मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो’, असे विधान माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
- त्यांच्या या विधानावर मुंडे म्हणाले की, लहान आका आणि मोठा आका, अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतो आहे.
- संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली आहे.
- त्यामुळे कोणी काय बोलावे आणि कोणाचे काय होणार? याला काहीही अर्थ नाही.