Chandrakant Patil : "राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा"; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:25 PM2022-05-25T19:25:25+5:302022-05-25T19:35:17+5:30

मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करत, राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. 

Why stay in politics, go at home and cook; Chandrakant Patil criticizes Supriya Sule over the OBC reservation | Chandrakant Patil : "राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा"; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

Chandrakant Patil : "राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा"; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

googlenewsNext

राज्यात ओबीसी समाज्याच्या राजकीय आरक्षणावरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. यातच, मुंबईसह १४ महानगरपालिकांत ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे राजकीय पक्ष तथा ओबीसी समाजातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याच मुद्द्यावर, मध्य प्रदेश सरकारचे अनुकरण करत, राज्यातील ओबीसी समाजालाही त्यांचे राजकीय आरक्षण परत मिळावे, या मागणीला घेऊन भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. 

मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टिका केली. 'मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला होता, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले, हे आम्हाला सांगितले नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे एका पत्रकारांने चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत, "कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी आणि स्वयंपाक करा, असे म्हटले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? -
सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी मोर्चात खासदार प्रितम मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाज आदी नेते उपस्थित होते. भाजपाच्या मुख्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी सुरू होताच आडवला आणि आंदोलकांना ताब्यात घेत, आंदोलन संपल्याचेही जाहीर केले.

Web Title: Why stay in politics, go at home and cook; Chandrakant Patil criticizes Supriya Sule over the OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.