५0 एसटी बसमध्ये चार दिवसांत वाय-फाय
By admin | Published: September 15, 2016 03:27 AM2016-09-15T03:27:41+5:302016-09-15T03:27:41+5:30
रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध केली जात असतानाच एसटी महामंडळानेही आपल्या सर्व प्रकारच्या बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला
मुंबई : रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध केली जात असतानाच एसटी महामंडळानेही आपल्या सर्व प्रकारच्या बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५0 बसमध्ये वायफाय बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत सेवा सुरू होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून एसटी बसमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील होते. त्याला अंतिम स्वरूप देत अखेर ५0 बसमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. त्यानुसार पुण्याच्या शिवाजीनगर, स्वारगेटमधून सुटणाऱ्या शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसमध्ये वायफाय बसवण्याचे काम सुरू केले आणि हे काम नुकतेच पूर्ण झाले. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले की, साधारण एक महिन्यापूर्वी वायफाय बसवण्याचे काम सुरू केले होते व हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता ५0 बसमध्ये वायफाय कसे हाताळावे त्यासंदर्भातील माहितीचे स्टीकर्स बसवण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच एसटीच्या १00 टक्के बसमध्ये वायफाय बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
वाय-फाय मिळविण्यासाठी
स्मार्ट फोनमधील वाय-फाय
सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. त्यानुसार फोनमधील इंटरनेट ब्राऊझर अॅप उघडल्यानंतर त्यांनी कंपनीने दिलेला यूआरएल टाईप केल्यावर प्रवाशांची प्राथमिक माहिती विचारली जाईल त्यानंतर एक मेन्यू प्रवाशांच्या स्मार्ट फोनवर दिसेल. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट व गाणी, बातम्या, लहान मुलांसाठी कार्टून चित्रपट, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका असा मनोरंजनाचा खजिना उघडला
जाईल. (प्रतिनिधी)