गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी

By admin | Published: February 9, 2017 05:58 PM2017-02-09T17:58:14+5:302017-02-09T17:58:14+5:30

गुगलने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जाहीर करण्यात आलेली वाय-फाय डील मिळवली आहे

Wi-Fi City will become Pune with the help of Google | गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी

गुगलच्या मदतीने पुणे बनणार वाय-फाय सिटी

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - गुगलने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जाहीर करण्यात आलेली वाय-फाय डील मिळवली आहे. या कराराअंतर्गत गुगल पुणे शहरामध्ये वाय-फाय सुविधा पुरवणार आहे. यासाठी गुगल आयबीएम, एल अँण्ड टी आणि रेलटेल यांच्यासोबत काम करणार आहे. या कराराअंतर्गत गुगल आपलं गुगल स्टेशन प्लॅटफॉर्म जाळं शहरात उभारणार आहे. गुगल स्टेशन प्लॅटफॉर्ममुळे सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय नेटवर्क मिळण्यामध्ये मदत मिळेल. विशेष म्हणजे गुगल स्टेशन मिळवणारं पुणे जगातील पहिलं शहर असणार आहे. 6 जानेवारी रोजी हा करार करण्यात आला आहे. 
 
'सर्व सार्वजनिक ठिकाणांना वाय-फाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून एकत्रित आणणे, आणि त्यासाठी फक्त एकदाच प्रमाणीकरण करायला लागावं हा या स्मार्ट सिटी मिशनचा मुख्य उद्देश असल्याचं', महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितलं आहे. 'यासाठी गुगलसोबत 150 कोटींचा करार करण्यात आला असून यामध्ये भांडवली खर्च, ऑपरेटिंग खर्च आणि महसूलसंबंधित खर्चाच समावेश असेल', अशी माहिती आयुक्तांनी यांनी दिली आहे. 
 

Web Title: Wi-Fi City will become Pune with the help of Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.