५८ शहरांत वायफाय स्पॉट

By admin | Published: January 11, 2016 03:28 AM2016-01-11T03:28:24+5:302016-01-11T03:28:24+5:30

डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत.

Wi-Fi spot in 58 cities | ५८ शहरांत वायफाय स्पॉट

५८ शहरांत वायफाय स्पॉट

Next

मुंबई : डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली
असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी १७४ वायफाय स्पॉट हे महाराष्ट्रातील ५८ शहरांतून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली.
आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. एनजीएन अर्थात नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख नवीन इंटरनेट कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोबाइलवरून इंटरनेटचा वापर सुलभ करणारे मोबाइल नेटवर्क इंटेलिजन्स केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या वतीने टाटा डोकोमोच्या माध्यमातून शेअर बाजाराच्या परिसरात वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवेचे अनावरण मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारचे डिजिटल इंडिया मिशन आणि त्या अनुषंगाने आगामी काळातील अपेक्षित घडामोडींची माहिती दिली. (प्रतिनिधी)
इंटरनेटवर ५० कोटी
नवे ग्राहक जोडणार मुंबई : केंद्राने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे ५० कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली. - सविस्तर वृत्त/९
ट्रायच्या अहवालानंतरच नेट न्यूट्रॅलिटीवर निर्णय
गेल्या वर्षात नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर यू टर्न घेतल्यानंतर, यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाला सर्वंकष अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात सरकार आपला ठोस निर्णय जाहीर करेल, असे रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांना वेगवान
इंटरनेट सेवा देण्यासाठी एमटीएनएलच्या माध्यमातून सध्या मुंबईत आॅप्टिकल फायबर नेटवर्कच्या जोडणीचे काम सुरू आहे. या माध्यमातून आगामी काही महिन्यांत सुमारे एक लाख ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. भारतीय टपाल खात्याने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. स्पीड पोस्ट कुरियर सेवेच्या माध्यमातून पोस्टाला मोठी भूमिका बजावता येणे शक्य आहे.
2013-14 या आर्थिक वर्षात तोटा नोंदविणाऱ्या या सेवेला ई-कॉमर्समुळे मोठा लाभ झाला आहे.

Web Title: Wi-Fi spot in 58 cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.