‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ लोगो डिझाइन स्पर्धा

By admin | Published: July 22, 2016 03:18 AM2016-07-22T03:18:35+5:302016-07-22T03:18:35+5:30

(एमटीडीसी) ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या महत्त्वाकांक्षी कॅम्पेनसाठी लोगो डिझायनिंग आणि टॅगलाइन लेखनाची कल्पक स्पर्धा जाहीर करत आहे.

'Widget Maharastra 2017' logo design competition | ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ लोगो डिझाइन स्पर्धा

‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ लोगो डिझाइन स्पर्धा

Next


मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या महत्त्वाकांक्षी कॅम्पेनसाठी लोगो डिझायनिंग आणि टॅगलाइन लेखनाची कल्पक स्पर्धा जाहीर करत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, त्यातून एमटीडीसी कल्पक मनांच्या आविष्कारातून महाराष्ट्राच्या पर्यटनाची विकासगाथा एका सार्वजनिक व्यासपीठावर मांडणार आहे.
ही स्पर्धा १८ जुलै, २०१६पासून चालू झाली असून, आपली प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १५ आॅगस्ट २०१६ आहे. विजेता लोगो ‘व्हिजिट महाराष्ट्र २०१७’ या कॅम्पेनसाठी १ वर्षाच्या कालावधीसाठी वापरण्यात येईल आणि विजेती टॅगलाइन हे
एक असे वाक्य असेल ज्यातून महाराष्ट्र पर्यटनाचे अभिनव मिशन आणि दृष्टिकोन दीर्घकाळासाठी प्रतिबिंबित होईल.
देशभरातील सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी ही स्पर्धा वैध असेल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे म्हणाल्या, देशात कल्पक व्यक्तींची कमतरता नाही.
या स्पर्धेमधून त्यांना पोर्टफोलिओमध्ये अशा डिझाइनचा समावेश करण्याची संधी मिळेल ज्यात लाखो लोकांकडून पाहिले जाण्याची क्षमता आहे आणि वर्षभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापूर्वक ओळख मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी त्यांना एमटीडीसीच्या मदतीने मिळेल. २०१६मध्ये होणाऱ्या प्रमुख आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये विजेत्याला आपले डिझाइन झळकलेले पाहता येईल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळतील. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी एमटीडीसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. (प्रतिनिधी)

Web Title: 'Widget Maharastra 2017' logo design competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.