चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व प्रियकराचा खून

By admin | Published: December 10, 2015 02:42 AM2015-12-10T02:42:16+5:302015-12-10T02:42:16+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला चाकूने ठार मारण्याची घटना कामोठेत घडली आहे. ध्रुवकांत ठाकूर (२८) असे आरोपीचे नाव आहे. ध्रुवकांत कामोठे पोलिसांना शरण आला आहे.

Wife and lover's blood on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व प्रियकराचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व प्रियकराचा खून

Next

पनवेल : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला चाकूने ठार मारण्याची घटना कामोठेत घडली आहे. ध्रुवकांत ठाकूर (२८) असे आरोपीचे नाव आहे. ध्रुवकांत कामोठे पोलिसांना शरण आला आहे.
ध्रुवकांत ठाकूर हा शिपिंग कंपनीमध्ये काम करीत होता. त्याची पत्नी सुष्मिता ठाकूर (२४) ही कामोठे एमजीएम येथे मेडिकलचे शिक्षण घेत होती. २०११ ला तिचा ध्रुवकांतबरोबर विवाह झाला होता, कामोठे सेक्टर १९ मधील वेदांत दृष्टी सोसायटीत ते राहत होते. दोघांमध्ये अनेक वेळा भांडण होत असल्याने वेगळे राहण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता, तसेच घटस्फोटासाठी प्रयत्नदेखील केले होते. या दोघांचे संबंध बिघडण्यात ध्रुवकांतचा मित्र अजयकुमार लालीप्रसाद जबाबदार असल्याचा राग ध्रुवकांतच्या मनात होता. बऱ्याच दिवसांपासून अजयकुमारचे सुष्मिताबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती ध्रुवकांतला मिळाली होती. अजयकुमार शिपिंग कंपनीमध्ये काम करीत होता. मंगळवारी रात्री दुबईवरून आल्यानंतर अजयकुमार थेट कामोठेमध्ये सुष्मिताला भेटण्यासाठी आला. यावेळी तिघांमध्ये चर्चा सुरू होती. अचानक या चर्चेचे रूपांतर भांडणात झाल्याने ध्रुवकांतने धारदार शस्त्राच्या सहाय्याने अजयकुमारचा खून केला. त्यानंतर पत्नीलादेखील ठार केले. बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर ध्रुवकांतने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा डाव फसला. ही सर्व घटना आरोपीने आपल्या बहिणीला फोनवर सांगितल्यावर बहिणीने कामोठे पोलिसांना माहिती दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, या संदर्भात अधिक तपास कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Wife and lover's blood on character suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.