पत्नी सभापती पण पतीराजच हाकतात कारभाराचा गाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 08:22 PM2016-07-20T20:22:14+5:302016-07-20T20:22:14+5:30
पत्नी एखाद्या पदावर असल्यानंतर त्याचा लाभ पतीराजच घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या माजलगाव येथील पंचायत समितीत पाहण्यास मिळतोय.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 20 - पत्नी एखाद्या पदावर असल्यानंतर त्याचा लाभ पतीराजच घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या माजलगाव येथील पंचायत समितीत पाहण्यास मिळतोय. पंचायत समितीच्या सभापती असलेल्या पत्नीची कामकाजात भूमिका त्यांचे पतीराजच वटवत असल्याने नागरिकांच्या भूवया उंचावल्या नाही तर नवलच. पंचायत समिती सभापती म्हणून अनिता विश्वांभर थावरे या केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र सध्या माजलगावकरांना पाहण्यास मिळत आहे. अगदी पंचायत समितीच्या बैठका असोत की कार्यक्रम सभापती म्हणून त्यांचे पतीच मिरवताना दिसतात. इतक्यावरच त्यांचे समाधान होत नसल्याने पंचायत समितीच्या गाडीतून आपल्या खासगी कामासाठी फिरण्याची हौसही ते भागवताना दिसतात. पंचायत समितीची शासकीय गाडी बिनदिक्ततपणे विश्वांभर थावरे वापरतात. त्यामुळे आता महिलांना कामकाजातून दूर ठेवणाऱ्या आणि शासकीय गाडीचा गैरवापर करणाऱ्या थावरे यांच्यावर कारवाईची मागणी पुढे येत आहे.