कंडक्टरचा घडविला पत्नीने खून

By admin | Published: February 27, 2017 03:19 AM2017-02-27T03:19:32+5:302017-02-27T03:19:32+5:30

दोरीने गळा आवळून पतीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या पत्नी सह तीन आरोपी मनोर पोलिसांनी गजाड केले

The wife of the conductor was murdered | कंडक्टरचा घडविला पत्नीने खून

कंडक्टरचा घडविला पत्नीने खून

Next


मनोर : दोरीने गळा आवळून पतीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या पत्नी सह तीन आरोपी मनोर पोलिसांनी गजाड केले असून त्यांना १ मार्च पर्यंत कोठडी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिक्षक निमित्त गोयल यांनी दिलेल्या माहिती नुसार मुंबई अहमदाबाद महामार्ग हलोली पाडोसपाडा येथे सापडलेल्या मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या खिशात कोरे तिकिटाचे कोरे पेपर्स त्याच्यावर एस टी चा लोगो व रा प ठाणे -२ आगार असे प्रिंट असलेल्या एका बाजूस एका इसमाचे नाव व दुसऱ्या बाजूस अन्य एका इसमाचे नाव चावीचा गुच्छा व मोबाईल नंबर मिळाले त्यावरून मृतदेहाची ओळख पटली.
त्यांचे नाव पांडुरंग दत्तात्रय फड वय ३० असून ते ओवळा ठाणे येथील राहाणारे होते. त्यांच्या घरी पत्नी गजश्री पांडुरंग फड हिला विचारणा केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना तिचा संशय आल्याने त्यांनी तिला पोलिसीखाक्या दाखविताच तिने कबुल केले की हा खून मी सुपारी देऊन घडवून आणला. लग्न झाल्यापासून तो दारू पिऊन माझा छळ करायचा, मला शिवीगाळ मारहाण करायचा मला मूल होत नसल्याने तो म्हणायचा तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्न लाऊन दे
त्यामुळे मी माझ्या गावातील शिवाजी वैजनाथ गायकवाड याला १ लाख रुपयांची सुपारी माझ्या नवऱ्याचा खून करण्यासाठी दिली होती.
शिवाजी वैजनाथ गायकवाड याने त्याच्या ट्रकवर असलेला क्लीनर यास ही कामगिरी सांगून त्या बदल्यात दहा हजार रुपये कबूल केले. फडला मारण्यासाठी त्यांनी त्याच्या पत्नीच्या माध्यमातून दि. २० रोजी घोडबंदर येथे बोलावून ट्रकमध्ये बसवले त्यानंतर फडला भरपूर दारू पाजली. नशेत असतांना ट्रकमधील नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला व हलोली पाडोस पाडा येथे त्याचा मृतदेह फेकून दिला अशी कबुली दोघांनी दिली. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: The wife of the conductor was murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.