पत्नीने उधळले पतीचे दुसरे लग्न!

By admin | Published: December 21, 2015 02:06 AM2015-12-21T02:06:04+5:302015-12-21T02:06:04+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करणाऱ्या पतीचे दुसरे लग्न नागपूर येथील एका महिलेने पोलिसांच्या मदतीने रविवारी उधळवून लावले

Wife married another husband! | पत्नीने उधळले पतीचे दुसरे लग्न!

पत्नीने उधळले पतीचे दुसरे लग्न!

Next

अकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करणाऱ्या पतीचे दुसरे लग्न नागपूर येथील एका महिलेने पोलिसांच्या मदतीने रविवारी उधळवून लावले. पोलिसांना पाहताच, नियोजित वधू व वराच्या नातेवाईकांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला.
नागपूरमधील एका उच्चशिक्षित युवतीचे मूर्तिजापूर येथील या वकील युवकासोबत पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु नंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. त्यामुळे पीडित महिलेने पतीविरुद्ध नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लग्नसमारंभासाठी नियोजित वधू व वराकडील मंडळी जमली; परंतु पत्नीला याची माहिती मिळाल्याने, ती तिच्या नातेवाईकांना घेऊन अकोल्यात दाखल झाली आणि तिने खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तिला पोलिसांसह येताना पाहताच वधू व विधिज्ञाकडील नातेवाईकांनी तेथून पळ काढला.

Web Title: Wife married another husband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.