नवरा रोज दारू प्यायचा अन् घरी येऊन मारायचा; भडकलेल्या बायकोनं रस्त्यावर पळवून पळवून हाणला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 01:09 PM2021-08-14T13:09:24+5:302021-08-14T13:13:03+5:30
नवऱ्याच्या रोजच्या कटकटिला कंटाळून अखेर बायकोने कैची उचलली आणि नवऱ्यावर प्रतिहल्ला केला.
रोज दारू पिऊन पती घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. मात्र एकेदिवशी पत्नीला मारहाण करणं पतीला चांगलेच महागात पडले. संतापलेल्या पत्नीनं कैची घेऊन पतीच्या मागेच लागली. पत्नीचा हा अवतार पाहून दारुड्या पतीची नशाच उतरली. जीव वाचवून पती घरातून बाहेर पळाला परंतु पत्नीने रस्त्यावरही त्याचा पाठलाग केला. पती-पत्नीच्या या भांडणाचा कुणीतरी व्हिडीओ बनवला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात नवरा-बायकोमध्ये झालेले भांडण सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. माहितीनुसार, नवरा दारू पिऊन घरी यायचा. त्यानंतर छोट्या गोष्टीवरूनही बायकोसोबत भांडण करून तिला मारहाण करत होता. दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घरी घडत होता. नवरा दारू पिऊन नशेत घरी आला. बायकोला अपशब्द वापरून तिला मारहाण करू लागला. परंतु आज दिवस वेगळा होता. नवऱ्याच्या मारहाणीला बायको वैतागली होती. आता शांत बसायचं नाही असा पवित्रा बायकोने घेतला होता.
नवऱ्याच्या रोजच्या कटकटिला कंटाळून अखेर बायकोने कैची उचलली आणि नवऱ्यावर प्रतिहल्ला केला. तेव्हा एका झटक्यातच नवऱ्याची नशा उतरली. कसाबसा नवरा घराच्या बाहेर पळाला मात्र बायको यावेळी थांबणार नव्हती. तिने नवऱ्याला पाठलाग केला. रस्त्यावर नवरा जीव वाचवण्यासाठी पुढे पुढे पळत होता तर बायको नवऱ्याला धडा शिकवायचा या विचाराने त्याचा पाठलाग करत होती. एकाने नवरा-बायकोच्या या भांडणाचा व्हिडीओ बनवला. बायकोनं नवऱ्यावर कैचीनं हल्ला करून त्याला जखमी केले.
रस्त्यात बायकोने नवऱ्यावर हल्ला केला. नवऱ्याच्या शरिरातून रक्त येऊ लागले. तरीही संतापलेल्या बायकोचा राग शांत झाला नाही. ती आणखी आक्रमक होत गेली. त्यावेळी थकलेला नवरा रस्त्यावर बसून राहिला. भररस्त्यात दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी दोघांची भांडणं सोडवली. बायकोचं डोकं भडकलं होतं. ती कुणाचंही काही ऐकायला तयार नव्हती. लोकांनी नवऱ्याला बायकोपासून दूर केले. त्यानंतरही ती नवऱ्यावर हल्ला करत होती. लोकांनी बायकोच्या हातून कैची सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने कैची घट्ट पकडल्याने कोणाच्याही हाती लागली नाही.
त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांनाही पकडून पोलीस स्टेशनला आणलं. जखमी नवऱ्याला पोलिसांनी मेडिकलसाठी दवाखान्यात पाठवलं. पोलिसांना याची माहिती दाम्पत्याच्या कुटुंबाला दिली असता नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी या दोघांमध्ये सामजंस्य घडवत दोघांनाही पुन्हा घरी पाठवले.