रखवालदाराकडून गळा आवळून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 05:41 PM2017-03-02T17:41:44+5:302017-03-02T17:41:44+5:30
कौटुंबिक वादातून रखवालदाराने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे उघडकीस आली. कमला रामू
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 02 - कौटुंबिक वादातून रखवालदाराने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे उघडकीस आली. कमला रामू विश्वकर्मा (वय २२, रा. चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रामू विश्वकर्मा (वय २३ ) या आरोपीला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वकर्मा कुटुंबिय मूळचे नेपाळचे आहेत. चिखली येथील धीरज अपार्टमेंटमध्ये तो रखवालदार म्हणून नोकरी करत होता. सोसायटीच्या बाजूलाच असलेल्या छोट्या खोलीत हे नेपाळी दांपत्य राहात होते. गुरुवारी सकाळी पती-पत्नीत भांडण झाले. भांडणात राग अनावर झालेल्या रामूने कमलाचा गळा आवळून खून केला. हा आत्महत्येचा प्रकार असावा, अशी सुरूवातीला चर्चा होती. मात्र नंतर पती रामुनेच कमलाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांना दोन मुले आहेत. पत्नीचा खून करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रामुला पोलिसांनी शिताफिने पकडले. कमलाचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
परप्रांतियांच्या माहितीचा अभाव ..
परप्रांतिय व्यकतींना सोसायट्यांमध्ये घरे भाड्याने देताना,कामावर नेमणूक करताना,त्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या अशी माहिती घेण्याबाबत उदासिनता दाखवतात. बहुतांशी ठिकाणी सोसायट्यांमध्ये नेपाळी लोक रखवालदार म्हणुन नेमलेले आहेत. त्यांना मराठी,हिंदी भाषा येत नाही.लिहिता, वाचता येत नाही, तरिही कमी मोबदल्यात उपलब्ध होत असल्याने सोसायट्यांमध्ये त्यांना प्राधान्याने रखवालदारीचे काम दिले जाते. रखवालदार म्हणुन नेमणूक केल्या जाणा-या व्यकतीची पार्श्वभूमी तसेच अन्य माहिती सोसायटीकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. हा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.