पैशांसाठी पत्नीची हत्या

By Admin | Published: March 9, 2015 01:55 AM2015-03-09T01:55:42+5:302015-03-09T01:55:42+5:30

गेल्या शुक्रवारी सकाळी श्रीवर्धनमधील मूळ गाव समुद्रकिनारी खैरुन्नीसा परवेझ दळवी व तिचा चार वर्षांचा मुलगा अजीज परवेझ या दोघांचे मृतदेह

Wife's murder for money | पैशांसाठी पत्नीची हत्या

पैशांसाठी पत्नीची हत्या

googlenewsNext

अलिबाग : गेल्या शुक्रवारी सकाळी श्रीवर्धनमधील मूळ गाव समुद्रकिनारी खैरुन्नीसा परवेझ दळवी व तिचा चार वर्षांचा मुलगा अजीज परवेझ या दोघांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत खैरुन्नीसा हिचे पिता अब्दुल रज्जाक इब्राहिम तांबे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात शनिवारी रीतसर तक्रार दाखल केली.
माहेरून पैसे आणले नाहीत या कारणास्तव खैरुन्नीसा हिचा पती परवेज फारुक दळवी यानेच अज्ञात साथीदारांच्या मदतीने या
दोघांना समुद्रात बुडवून ठार मारल्याचे तक्रारीत नमूद केल्याने श्रीवर्धन पोलिसांनी परवेज फारुक दळवी याला अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शुक्रवारी ही घटना समोर आल्यावर प्रारंभी या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असावा, असा कयास होता. मुस्लीम
बांधवांनी या प्रकरणी पोलिसांनी योग्य तो छडा लावावा, याकरिता श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
श्रीवर्धन पोलिसांवर मोठा दबाव होता. अशा परिस्थितीत श्रीवर्धन पोलीस उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी
श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक राजकुमार चाफेकर यांच्या सहकार्याने या प्रकरणात जातीने लक्ष घालून, घटनास्थळाची व मृतदेहाची सखोल पाहणी करून, तपासास प्रारंभ केला. अधिक तपास चाफेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Wife's murder for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.