जोडीदाराच्या शोधात वाघिणीचे ‘सीमोल्लंघन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:02 AM2017-12-27T05:02:34+5:302017-12-27T05:02:43+5:30

पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रापासून तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे असलेले अंतर एका वाघिणीने जोडीदाराच्या शोधात पार केले.

 Wife's 'seamless' search for a spouse! | जोडीदाराच्या शोधात वाघिणीचे ‘सीमोल्लंघन’!

जोडीदाराच्या शोधात वाघिणीचे ‘सीमोल्लंघन’!

Next

नम्रता फडणीस ।
पुणे : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रापासून तब्बल ११० किलोमीटरचे मानवी अडथळे असलेले अंतर एका वाघिणीने जोडीदाराच्या शोधात पार केले. सध्या ती भंडारा जिल्ह्यातील उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्यात असून नव्या क्षेत्राची चाचपणी करीत आहे.
एखाद्या भागातील अभयारण्यामधले क्षेत्र धोकादायक वाटले किंवा भक्ष्याच्या अथवा जोडीदाराच्या शोधात साधारणपणे वाघ हे दुस-या जागी स्थलांतरित झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यासाठी वाघांनी अगदी ४०० किलोमीटरचे अंतर पार केल्याची उदाहरणे आहेत. मात्र वाघिणींचे प्रमाण त्यातुलनेत अगदीच नगण्य आहे. या वाघिणीने रेल्वेमार्ग, वैनगंगा नदी, वीज प्रकल्प, मानवी वस्ती असे अडथळे पार करून उमरेड करांडला पवनी अभयारण्यात २३ डिसेंबरला प्रवेश केला आहे. तो क्षण पुण्यातील प्रणव जोशी व सुमीत खरे या पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकारांनी कॅमे-यात टिपला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शिवांझरी या वाघिणीच्या चार बछड्यांपैकी एका नर आणि मादी बछड्याला वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (डब्लूआयआय) ने अभ्यासादरम्यान मार्च २०१७मध्ये कॉलर आयडी बसविले होते. त्यातीलच ही एक वाघीण आहे. ही वाघीण स्वत:चा अधिवास निर्माण करायला आली आहे. याला उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा विष्णू राऊत यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, ही कोळसा परिक्षेत्रातील ताडोबा अंधेरी प्रकल्पातून जोडीदाराच्या शोधात आलेली वाघिण आहे.
>‘उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्यात सध्या वाघांची संख्या १४ आहे. त्यामुळे ती इथे राहाण्याची शक्यता काहीशी कमी आहे. ती मार्गक्रमण करीत भोर व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रात जाण्याची शक्यता अधिक आहे.
- दादा विष्णू राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरेड करांडला पवनी वन्यजीव अभयारण्य.

Web Title:  Wife's 'seamless' search for a spouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ