मुंबईकरांसाठी वायफाय सेवा बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 09:37 PM2017-02-27T21:37:42+5:302017-02-27T21:37:42+5:30

रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध केल्यानंतर आता बेस्ट उपक्रमही ही भेट देणार आहे. ५२ बसमार्गांवर प्रवाशांना लवकरच वायफाय सेवेचा

Wifi service for Mumbaikars Best | मुंबईकरांसाठी वायफाय सेवा बेस्ट

मुंबईकरांसाठी वायफाय सेवा बेस्ट

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध केल्यानंतर आता बेस्ट उपक्रमही ही भेट देणार आहे. ५२ बसमार्गांवर प्रवाशांना लवकरच वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. काही प्रमुख बस स्थानकांमध्येही वायफायची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऐवढचे नव्हे तर यासाठी बसविण्यात आलेल्या रॉयटर्समुळे बस किती वेळेत त्या बस स्थानकावर पोहोचेल, याची माहिती मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असतात. आजच्या हायटेक युगात जगाच्या पुढे राहण्यासाठी वायफाय सेवा काळाची गरज बनली आहे. यामुळे रेल्वेपाठोपाठ बेस्ट उपक्रमानेही बसगाड्यांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महत्वाचे बस स्थानक आणि बसगाड्यांमध्ये राऊटर्स बसविण्यात येणार आहेत. दर महिन्याला पाचशे बसगाड्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

बसची अचूक वेळ कळणार...
बस स्टॉपवर बसगाडी येण्याची वाट बघत प्रवाशांना बराच काळ तिष्ठत राहावे लागत असते. मात्र राऊटर्समधील ग्लोबल पॉझिशनिंग सिस्टममुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरील अ‍ॅपवर इच्छित बस किती वेळेत बसस्टॉपवर पोहोचेल, याची अचूक वेळ मिळू शकणार आहे.

बेस्ट उत्पन्न...
आर्थिक संकटात असलेले बेस्ट उपक्रम कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे खर्च करण्याच्या मनस्थितीत नाही़. त्यामुळे उत्पन्न आणि सेवा असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अंदाजे दोन कोटी ६३ लाख रुपये उत्पन्न जाहिरातीच्या माध्यमातून बेस्टला मिळण्याची शक्यता आहे़ तसेच या सेवेचा लाभ ३० लाख प्रवाशांना घेता येणार आहे. 

- ४०१५ राऊटर्स बसगाड्या व बस स्थानकांमध्ये बसविण्यात येणार आहेत.
- यामुळे ५२ बस मार्ग आणि ३९६३ बसगाड्यांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे. 
- याचा लाभ ३० लाख प्रवाशांना मिळू शकेल.
- बेस्ट उपक्रमाला जाहिरातीच्या माध्यमातून अडीच ते तीन कोटी उत्पन्न मिळू शकेल.

Web Title: Wifi service for Mumbaikars Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.