उंचीसाठी ‘विग’ लावला!

By admin | Published: March 26, 2017 02:40 AM2017-03-26T02:40:50+5:302017-03-26T02:40:50+5:30

परीक्षेत पास होण्यासाठी कॉपीबहाद्दरांकडून विविध शक्कल लढविली जाते, मात्र कायदा व सुव्यवस्था राखणारे व

'Wig' for height! | उंचीसाठी ‘विग’ लावला!

उंचीसाठी ‘विग’ लावला!

Next

नाशिक : परीक्षेत पास होण्यासाठी कॉपीबहाद्दरांकडून विविध शक्कल लढविली जाते, मात्र कायदा व सुव्यवस्था राखणारे व गुन्हेगारांना जरब बसविणाऱ्या पोलिसांना शनिवारी चक्क भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने ‘मामू’ बनविण्याचा प्रयत्न केला़ या तरुणाने दोन सेंटीमीटर उंची वाढविण्यासाठी चक्क डोक्यावर नकली केसांचा टोप अर्थात विग लावला होता़
त्याची ही बनवेगिरी चाणाक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली व युवकास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागले़ शनिवारी त्र्यंबकेश्वरहून राहुल किसन पाटील भरतीसाठी आला होता. भरतीसाठी आवश्यक १६५ सेमी उंचीसाठी त्याने चक्क केसाचा टोप परिधान केला होता. एका चाणाक्ष पोलीस कर्मचाऱ्यास त्याच्या केसांबाबत संशय आला व त्याने ही बाब पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आणून दिली़ त्यांनी तत्काळ त्यास जवळ बोलावून तपासणी केली असता त्याने डोक्यावर विग लावल्याचे उघडकीस आले.
पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पोलीस खात्याची फसवणूक करणाऱ्या या युवकास भरतीप्रक्रियेत अपात्र ठरविले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत़ राहुलवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकाची उंची योग्य भरल्याने प्रथम त्यास पात्र ठरविण्यात आले होते़ मात्र त्याचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा वापर करु नये, त्यासाठी आयुष्यभरासाठी नोकरीची संधी गमवावी लागेल़
- श्रीकांत धिवरे,
पोलीस उपायुक्त, नाशिक शहर
.

Web Title: 'Wig' for height!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.