‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:06 AM2017-07-27T04:06:20+5:302017-07-27T04:06:24+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते.

wiil bartis Director General's Investigation | ‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

Next

धनाजी कांबळे 
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत ‘बार्टी’चे आॅडीट करण्यात येत असून, महासंचालक राजेश ढाबरे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘बार्टी’तर्फे राबविण्यात येत असलेल्या समतादूत प्रकल्पांसह विविध प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याची कुणकुण लागल्यानंतर समतादूत संघर्ष समितीने माहिती मागविली. त्यातून गैरकारभार चव्हाट्यावर आला. महासंचालक राजेश ढाबरे, प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, निबंधक सविता नलावडे, स्वीय सहायक गौरव निकम यांच्या चौकशीची मागणी समितीने केली होती. याची दखल घेत महासंचालक ढाबरे यांची चौकशीचे आदेश सामाजिक न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी प्र. वि. देशमुख यांनी समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत.
विभागीय प्रकल्प अधिकारी गंगाधर गायकवाड यांनी माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळेची बोगस बिले मंजूर केल्याचे माहिती अधिकारात समोर आले असून, त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी केली आहे.

‘बार्टी’चे महासंचालक आणि संबंधित अधिकाºयांची लवकरच चौकशी करून शासनास अभिप्रायासह अहवाल दिला जाईल.
- मिलिंद शंभरकर,
आयुक्त, समाजकल्याण विभाग
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या बार्टीचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे हे देखील पुण्याचे असल्याने त्यांनी बार्टीतील गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: wiil bartis Director General's Investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.