वन्य जीवांवर होणार संशोधन!
By admin | Published: July 8, 2014 12:14 AM2014-07-08T00:14:16+5:302014-07-08T00:14:16+5:30
वनविकास महामंडळ आणि ‘माफसू’त सामंज्यस करार
अकोला : वन्य जीवांवर संशोधन व उपचार करण्यासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे वन्य जीव संशोधन आणि प्रशिक्षण प्रकल्प होणार असून, या प्रकल्पासाठी वनविकास महामंडळ आणि महाराष्ट्र पशू विज्ञान (माफसू) विद्यापीठामध्ये सामंज्यस करार झाला आहे. १८ कोटींच्या या प्रकल्पासाठी मनुष्यबळ मिळावे, यासाठीचा प्रस्ताव माफसूने राज्य शासनाला पाठविला आहे. राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र विदर्भात आहेत. वन्य प्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे; तथापि या वनक्षेत्रातील वन्य जीव आजारी पडत असतील कि ंवा व्याधीने ग्रस्त असतील, तर त्या वन्य प्राण्यांवर वन्य जीव खात्याच्या परवानगीशिवाय उपचार करणे कठीण असते. त्यामुळे या आजाराची किंवा साथीची लागण इतर वन्य प्राण्यांना होण्याची भीती असते. या पृष्ठभूमीवर वनविकास महामंडळ आणि महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठ एकत्र आले असून, वन्य जीव संशोधन आणि प्रशिक्षण प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय, या दोन्ही शासकीय संस्थांनी घेतला आहे. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व संसाधने वनविकास महामंडळ माफसूला उपलब्ध करू न देणार आहे. यात जमीन व इतर आवश्यक यंत्रसामग्रीचा समावेश असून, माफसूतर्फे तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करू न दिले जाणार आहे. मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने, माफसूने शास्त्रज्ञ, तज्ज्ञांच्या पदाची मागणी शासनाकडे केली आहे. वनविकास महामंडळ आणि माफसूने वन्य जीव संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरीही घेतली आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना वन्य जीवांचा अभ्यासही करता येणार आहे. या प्रकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे.