आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करणार - विष्णू सावरा

By admin | Published: November 4, 2016 07:56 PM2016-11-04T19:56:42+5:302016-11-04T19:56:42+5:30

तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांना दिले आहेत.

Will abolish the Adiwasi Ashram School's approval - Vishnu Sawara | आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करणार - विष्णू सावरा

आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करणार - विष्णू सावरा

Next
>खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 04 - तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांना दिले आहेत. त्याचप्रमाणे दोषी शिक्षक व कर्मचा-यांना निलंबीतही करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र ३० दिवसाचे आंत न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सावरा यांनी सांगितले. आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबतही शासन प्रयत्नशील आहे. प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यादृष्टीने या प्रकरणात एसआयटी देखील नेमली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याप्रमाणे वरिष्ठ महिला अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली संपुर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष समितीही स्थापन केल्या जाणार आहे. आदिवासी आयुक्तांना आश्रम शाळा रद्द करण्याबाबत आदेश दिले असून ही आश्रम शाळा रद्द केल्यानंतर या शाळेमधील विद्यार्थ्यांना विविध तीन जिल्ह्यांमधील शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबतही आदिवासी आयुक्तांना निर्देश देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री सावरा यांनी याप्रसंगी सांगितले. पत्र परिषदेला  कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर, आमदार डॉ.अशोक उईके उपस्थित होते. 
 
प्रकरणाचे राजकारण करायचे नाही
पाळा येथील आश्रम शाळेमधील एका अल्पवयीन विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार केली असली तरी या प्रकरणात आणखी विद्यार्थीनींवर अत्याचार झाल्याची शक्यता आहे. अशा अतिसंवेदनशिल प्रकरणामध्ये विरोधक काय बोलत आहेत व या प्रकरणाचेही कशाप्रकारे राजकारण करीत आहेत. हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा नाही आम्हाला या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून द्यायचा असून कोणतेही राजकारण करायचे नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Will abolish the Adiwasi Ashram School's approval - Vishnu Sawara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.