रविवारीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

By admin | Published: January 28, 2017 01:11 AM2017-01-28T01:11:26+5:302017-01-28T01:11:26+5:30

महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील

Will accept nominations on Sundays | रविवारीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

रविवारीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

Next

मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या सोयीकरिता रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी २९ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.

Web Title: Will accept nominations on Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.