उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 01:47 PM2024-09-01T13:47:28+5:302024-09-01T13:48:53+5:30

यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत...

Will ask Congress to apologize Devendra Fadnavis's question to Uddhav Thackeray by naming Pandit Nehru | उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पंडित नेहरूंचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा बोचरा सवाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर, संपूर्ण राज्यातील राजकाण जबरदस्त तापले आहे. याप्रकरणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली. मात्र, तरीही या मुद्यावरून सरकारचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारला 'जोडे मारो' आंदोलन करत आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बोचरे प्रश्न केले आहेत. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले फडणवीस? -
फडणवीस म्हणाले, "माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडेजर लावून तोडला, त्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हाटवला, त्या बद्दल एक शब्दही का बोलत नाहीत, सर्वप्रथम याचे उत्तर द्यायला हवे." 

"एवढी वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजीना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण, जणू काही महाराज सामान्य माणसाची लुट करायला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाल एवढी वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात?  हे सागितलं पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Will ask Congress to apologize Devendra Fadnavis's question to Uddhav Thackeray by naming Pandit Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.