विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच कायद्यात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:46 AM2017-07-28T02:46:38+5:302017-07-28T02:46:41+5:30
सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
मुंबई : सत्ताधारी पक्षांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी एखाद्या कायद्यात बदल करणे चुकीचे असून या नवीन कायद्याद्वारे विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
विधानसभेत सरकारच्या वतीने आणलेल्या महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता विधेयकावर बोलताना शिंदे म्हणाले, राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वीच केलेल्या कायद्यात पुन्हा बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यांना तीस दिवसांच्या आत सरकारकडे अपील करणे बंधनकारक असणार आहे. सरकारमधील मंत्र्याकडे निर्णय अधिकार येणार असल्याने त्यांच्याकडून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तसेच एखाद्या सदस्यावर स्वपक्षाला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो. हे विधेयक आणून सरकारने निर्णय अधिकारी असणारे जिल्हाधिकारी व आयुक्तांवर एकप्रकारचा अविश्वास दाखविला आहे. जसे सरकारने अपिलासाठी ३० दिवसांचे बंधन घातले आहे.