मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:38 AM2017-07-28T04:38:48+5:302017-07-28T04:39:06+5:30

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते.

Will be Mumbai to raigad Water migration Soon | मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

मुंबई-रायगड जलप्रवास लवकरच

Next

विशेष प्रतिनिधी 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा व रेवस, उरण तालुक्यातील घारापुरी-एलिफंटा आणि मोरा या चार बंदरांवर मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. या चारही बंदरांवरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्याकरिता शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षित व सुरळीत प्रवासी वाहतुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४९ प्रवासी जेट्टीच्या ठिकाणी प्रसाधनगृह, प्रवासी शेड, आसन व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, अपंग व वृद्ध व्यक्तींकरिता व्हीलचेअर वा बॅटरीवर चालणाºया गाड्यांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये ३० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून पावसाळ्यानंतर कामे हाती घेण्यात येतील, तसेच गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी दिल्याची माहिती विधानपरिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबईतील भाऊचा धक्का येथून रायगड जिल्ह्यातील मोरा (ता.उरण) व रेवस (ता.अलिबाग) अशी जलप्रवासी वाहतूक करण्यात येते. गेटवे आॅफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथील जेट्टी सुविधा या मुंबई बंदर विश्वस्त यांच्या अखत्यारीत येतात, तर मांडवा, घारापुरी, मोरा व रेवस येथील जेट्टी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या नियंत्रणाखाली येतात. या सर्व मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत खासगी जलवाहतूक संस्थांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.
विधानपरिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोºहे यांनी दाखल केली होती. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया व भाऊचा धक्का येथून प्रवास करण्यासाठी असलेल्या बोटी जुनाट व गळक्या असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. गैरसोयी दूर करण्याऐजवी बंदर विभागाचे अधिकारी आणि बोटींचे मालक यांच्यातील संगनमतामुळे मालकांकडून प्रवाशांच्या होणाºया असुरक्षितेबाबत व वाढत्या तिकिटदराबाबत आतापर्यंत कोणतीच सक्षम कार्यवाही होत नसल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी व प्रवासी बोटीची अवाजवी शुल्कवाढ रोखण्यास्तव शासनाने हस्तक्षेप करून याप्रकरणी निर्णयात्मक कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. नीलम गोºहे यांनी या वेळी सांगितले. याच लक्षवेधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

मोरा जेट्टीवर विद्युत व्यवस्था सुस्थितीत कार्यरत आहे. जोरदार पावसामुळे रेवस जेट्टी येथील विद्युत व्यवस्था तात्पुरती बंद असून ती पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
मोरा व रेवस येथे मासळी उतरविण्यासाठी मच्छीमारांकरिता स्वतंत्र जेट्टी नसल्यामुळे प्रवासी जेट्टीवर मासळी उतरविली जाते.
या मासळीचा प्रवासी वर्गाला त्रास होऊ नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या क्षेत्रीय कर्मचारावर्गामार्फत मच्छीमारांना वेळोवेळी सूचना करण्यात येत असते. त्याचबरोबर जेट्टी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असते, असे मुख्यमंत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Will be Mumbai to raigad Water migration Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.