कॅथॉलिकचे स्वीकृत परेरा अपात्र ठरणार?

By Admin | Published: November 3, 2016 03:08 AM2016-11-03T03:08:34+5:302016-11-03T03:08:34+5:30

कॅथॉलिक बँकेच्या आणखी एका संचालकाला तीन अपत्य असल्याप्रकरणी सहकार खात्याने अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली आहे.

Will Catholics get approved inappropriate? | कॅथॉलिकचे स्वीकृत परेरा अपात्र ठरणार?

कॅथॉलिकचे स्वीकृत परेरा अपात्र ठरणार?

googlenewsNext

शशी करपे,

वसई- स्वीकृत संचालक तीन अपत्यांमुळे अपात्र ठरल्याची घटना ताजी असतानाच वसईतील बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या आणखी एका संचालकाला तीन अपत्य असल्याप्रकरणी सहकार खात्याने अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली आहे.
बॅसीन कॅथॉलिक बँक वसईतील अग्रगण्य शेड्यूल्ड बँक असून बँकेतील स्वीकृत संचालक व्हॅलेरिन रॉड्रीग्स यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे संचालकपद पुणे येथील सहकार आयुक्तांनी रद्द केले होते. रॉड्रीग्स यांना सहकार खात्याने नोटीस बजावल्यानंतर त्यांनी स्वत:हून राजीनामाही दिला होता.
आता सांडोर भागातून निवडून आलेले सचिन परेरा यांना तीन अपत्ये असल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. संचालक परेरा यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी तक्रार सुनिता लेमॉस यांनी बँकेच्या प्रमुख महाव्यवस्थापकांकडे केली होती. बँकेने त्यांना सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लेमॉस यांनी पुणे येथील सहकार आयुक्तांकडे तक्रार केली
होती. सांडोर येथील मुंडाळे गावातील कायस फर्नांडिस यांनीही सहकार आयुक्तांकडे याप्रकरणी पाठपुरावा सुरु केला होता.
ही तक्रार दाखल झाली असतानाच स्वीकृत संचालक व्हॅलेरिन रॉड्रीग्स यांना तीन अपत्ये असल्याने अपात्र ठरवण्याची सुनावणी सुुरु होती. त्यात अप्पर आयुक्तांनी रॉड्रीग्स यांना अपात्र ठरवले. त्यानंतर सचिन परेरा यांनाही याच धर्तीवर अपात्र ठरवण्यात यावे, यासाठी लेमॉस आणि फर्नांडीस यांनी पाठपुरावा सुरु केला होता.
अखेर सहकार खात्याने परेरा यांना नोटीस बजावली आहे. येत्या १० नोव्हेंबरर्पंत परेरा यांना आपले म्हणणे मांडण्याचे नोटीसीत बजावण्यात आले आहे. अपात्रतेच्या लटकत्या तलवारीच्या या प्
>कलम ७३ व ७८ नुसार बजावली नोटीस
आता सांडोर भागातून निवडून आलेले सचिन परेरा यांना तीन अपत्ये असल्याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७३ सी ए आणि कलम ७८ ए नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे येथील सहकार अपर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपेपर्यंत अपात्र का घोषित करण्यात येऊ नये याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी अपर आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Web Title: Will Catholics get approved inappropriate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.