सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार?

By संजय पाठक | Published: May 11, 2023 09:56 AM2023-05-11T09:56:50+5:302023-05-11T09:57:55+5:30

सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये दुपारी चार वाजता दाखल होणार आहे दरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत.

Will Chief Minister Eknath Shinde-Sanjay Raut come together during the Nashik tour in a power struggle? | सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार?

सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार?

googlenewsNext

नाशिक- राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च फैसला होणार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येणार असून ठाकरे गटाच्या आमदाराच्या कौटुंबिक सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे अनेकांच्या भोवळ्या उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे देखील याच आमदाराच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी सायंकाळी नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघातील आमदार किशोर दराडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सायंकाळी नाशिकच्या त्रंबक रोडवरील ग्रेप कौंटी येथे होणार आहे या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये दुपारी चार वाजता दाखल होणार आहे दरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे हे देखील नाशिकमध्ये येणार असल्याचं ठाकरे गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Will Chief Minister Eknath Shinde-Sanjay Raut come together during the Nashik tour in a power struggle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.