‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध लढा सुरूच ठेवणार
By Admin | Published: April 3, 2017 01:22 AM2017-04-03T01:22:25+5:302017-04-03T01:22:25+5:30
प्रत्येक काम, आंदोलन हे अहिंसेच्या मार्गानेच करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हेच योग्य आदर्शवत आहे
पुणे: प्रत्येक काम, आंदोलन हे अहिंसेच्या मार्गानेच करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि हेच योग्य आदर्शवत आहे. कामचुकार प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून, जर दिव्यांंग व्यक्तींची कामं मुद्दामहून रोखली जात असतील, त्यांचा अपमान केला जात असेल तर अशा वेळी अधिकाऱ्यांच्या कानाचे माप घ्यावे लागते, मग लाख गुन्हे माझ्यावर नोंदवले गेले तरी हरकत नाही, अशा शब्दांत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे नेते आ. बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली.
अपंग पुनर्वसन क्षेत्रातील कार्याबद्दल समाजशास्त्रज्ञ समीर घोष, रामदास म्हात्रे आणि संवेदनशील कार्यकर्ता अशी ओळख असलेले स्वागत थोरात यांचा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. लोकशाही समंजस संवादतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे उपस्थित होते. प्रार्थनास्थळे वर्गणीतून बांधली जातात पण अपंग व्यक्तीच्या घराचा दरवाजा बसविला जात नाही, या बद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली.
सूत्रसंचालन अरुण खोरे यांनी केले. (प्रतिनिधी)
>सामाजिक संस्था व सरकार या समस्या पूर्णपणे सोडवू शकत नाही, समाजातील प्रत्येकाने या लोकांबाबत केवळ सहानुभूती न दाखवता आपले कर्तव्य समजून त्यांना मदत करत योगदान दिले पाहिजे.
- समीर घोष, समाजशास्त्रज्ञ