मेट्रोसाठी पक्षांची कार्यालये हटविणार

By admin | Published: March 11, 2015 02:05 AM2015-03-11T02:05:14+5:302015-03-11T02:05:14+5:30

मेट्रो-३ प्रकल्पाच्या उभारणीसाठी विधानभवनजवळ स्थानक उभारण्याकरता काही शासकीय कार्यालये वा विविध राजकीय पक्षांची

Will delete party offices for Metro | मेट्रोसाठी पक्षांची कार्यालये हटविणार

मेट्रोसाठी पक्षांची कार्यालये हटविणार

Next

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या उभारणीसाठी विधानभवनजवळ स्थानक उभारण्याकरता काही शासकीय कार्यालये वा विविध राजकीय पक्षांची कार्यालये हटविण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, गिरगाव भागातील २०० च्या वर चाळी या प्रकल्पासाठी हटविण्यात येणार आहेत ही बाब मात्र खरी नाही.
गिरगाव स्थानकासाठी बाधित इमारतीतील रहिवाशांसोबत चर्चा करून त्यांच्या पुनर्वसनाबाबतचा आराखडा तयार करणे प्रस्तावित आहे. शहीद भगतसिंग मार्ग आणि फ्री प्रेस मार्गावरील शासकीय व राजकीय कार्यालयांच्या स्थलांतराचा व पर्यायी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्या बाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. खासगी इमारती, पक्ष कार्यालय व शासकीय कार्यालयांचे पुनर्वसन नजिकच्या परिसरात भाडे तत्वावरील इमारतींमध्ये करण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
म्हाडाचे बोगस लाभार्थी; ५१ प्रकरणांमध्ये चौकशी मुंबईत म्हाडाची घरे बळकावण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची ५१ प्रकरणे तपासण्यात येत असून या प्रकरणी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.
या प्रकरणी म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी चौकशी करीत आहेत, असे त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नात लेखी उत्तर देताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Will delete party offices for Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.