वेल्हे तालुक्यात पर्यटनाचा विकास करणार : बापट

By admin | Published: July 22, 2016 01:26 AM2016-07-22T01:26:10+5:302016-07-22T01:26:10+5:30

आगामी काळात तालुक्यात पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, जिल्हा नियोजनमधून विविध कामे केली जाणार आहेत

Will develop tourism in Velhe taluka: Bapat | वेल्हे तालुक्यात पर्यटनाचा विकास करणार : बापट

वेल्हे तालुक्यात पर्यटनाचा विकास करणार : बापट

Next


मार्गासनी : ‘‘आगामी काळात तालुक्यात पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, जिल्हा नियोजनमधून विविध कामे केली जाणार आहेत,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
वेल्हे येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन वेल्हे येथील लक्ष्मीगंगा कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बापट बोलत होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, संघटनमंत्री रवी अनासपुरे, माजी आमदार शरद ढमाले, महिला जिल्हा नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अध्यक्षा क्रांती सोमवंशी, तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, वेल्हे तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनोज जगताप, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, शोभा पासलकर, अण्णा शिंदे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नाना साबणे, रवींद्र दसवडकर, विश्वास दामगुडे, नीलेश कुलकर्णी, दिनेश मळेकर उपस्थित होते.
या वेळी रिपाइंचे श्रीरंग भिंगारे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी तालुक्यातील वेल्हे-मढे घाटरस्ता, राजगड, तोरणा गडास पर्यटनाचा दर्जा, तसेच तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पाणी तसेच धरणग्रस्तांच्या विविध समस्या मांडल्या. या सर्व समस्या सोडावाव्यात, अशी मागणी गिरीश बापट यांच्याकडे केली. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वा.प्र.)
>वेल्हे तालुक्यात अनेक समस्या आहेत. या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. पण या समस्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडविणे आपले काम आहे. यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागून शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाचा कार्यकर्ता गेला पाहिजे.
-गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: Will develop tourism in Velhe taluka: Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.