एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही?; शिवसेना नेत्याने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:51 PM2024-12-03T12:51:44+5:302024-12-03T12:53:23+5:30

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. आझाद मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे, पण कोण कोणत्या पदाची शपथ घेणार, याबद्दलचे गूढ काय आहे. 

Will Eknath Shinde be in the grand coalition government or not?; The Shiv Sena leader replied | एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही?; शिवसेना नेत्याने दिलं उत्तर

एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये असणार की नाही?; शिवसेना नेत्याने दिलं उत्तर

Maharashtra Chief Minister News: २८८ पैकी २३० जागा जिंकत महायुतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. पण, निकालानंतर खरा गोंधळ बघायला मिळाला. गेल्या दहा दिवसांत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार, याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? सरकारमध्ये असणार का? या प्रश्नाभोवतीही चर्चेंने फेर धरला आहे. याबद्दल शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली. 

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर झालेली आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असून, महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी (३ डिसेंबर) पाहणी केली. 

यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना माध्यमांशी सरकार स्थापनेबद्दल प्रश्न विचारले. 

संजय शिरसाट म्हणाले, "महायुतीचे नेते चर्चा करत आहेत. ५ तारखेला मोठ्या जल्लोषात शपथविधी सोहळा येथे संपन्न होईल."

शिंदे महायुती सरकारमध्ये असतील का?

महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, "याबद्दल आज (३ डिसेंबर) सायंकाळी कळेल. रात्री उशिरा बैठक होईल. दुपारी मुख्यमंत्र्यांचीही सह्याद्री अतिथीगृहावर वेगळ्या विषयावर बैठक आहे."

अजून आमची बैठकच झाली नाही -गिरीश महाजन

आझाद मैदानात पाहणीसाठी आलेले गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही, याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, "अजून आमच्या पक्षाची बैठकच झाली नाहीये. उद्या (४ डिसेंबर) साडेचार वाजता भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक आहे. त्यात हे ठरेल. मुख्यमंत्री दुपारी येत आहेत. ६ डिसेंबरच्या संदर्भात त्यांची एक बैठक आहे. त्यानंतर आम्ही सगळे मिळून चर्चा करू", अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. 

Web Title: Will Eknath Shinde be in the grand coalition government or not?; The Shiv Sena leader replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.