सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:14 IST2025-02-09T13:13:18+5:302025-02-09T13:14:34+5:30

गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते.

Will Eknath Shinde get Rajan Salvi to join Shiv Sena without considering the Uday Samant and Kiran Samant brothers? | सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार?

सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार?

रत्नागिरी - उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. त्यातच येणाऱ्या १३ फेब्रुवारीला ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असं बोललं जात आहे. मात्र साळवींच्या या पक्षप्रवेशाची अफवा असल्याचं आमदार किरण सामंत यांनी म्हटलं आहे. तर किरण सामंतांना विचारल्याशिवाय पक्षप्रवेश होणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

या पक्षप्रवेशाच्या बातमीवर उदय सामंत म्हणाले की, अनेक वेळा राजन साळवींनाएकनाथ शिंदे आणि मीदेखील विनंती केली होती. तुम्ही आमच्यासोबत या, परंतु काही अडचणींमुळे ते येऊ शकले नसतील. मात्र त्यांचा पराभव माझे मोठे बंधू किरण सामंत यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच ही प्रक्रिया राबवणे आवश्यक वाटते. जर काही पुढे जायचे असेल एकनाथ शिंदे हे किरण सामंत यांना विश्वासात घेऊन, आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून निर्णय घेतील मात्र सध्या काही निर्णय झालाय हे मला माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केले.

तर राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेतही परंतु एकनाथ शिंदे ते त्यांना पटकन पक्षात घेतील असं वाटत नाही. राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतोय ही पूर्णपणे अफवा आहे. असा निर्णय घेताना मला, उदय सामंत यांना नक्कीच विचारात घेतील अशी खात्री आहे. निलेश राणे, भरतशेठ गोगावले आणि कोकणातील इतरांना विश्वासात घेऊनच एकनाथ शिंदे निर्णय घेतील. मात्र सध्या यावर एकनाथ शिंदे आणि आमची कुठलीही चर्चा झाली नाही असं आमदार किरण सामंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राजन साळवी शिंदेसेनेत प्रवेश करणार होते. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल आणि त्यानंतर आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी आशा त्यांना असावी. पण तसे घडले नाही. गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत. त्यांच्यासोबत जाण्यास कोणीही तयार नाही. किंबहुना ते ज्या पक्षात जातील, तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येतील असा दावा किरण सामंत यांनी अलीकडेच केला होता. त्यामुळे सामंत बंधूंना विचारात न घेता एकनाथ शिंदे राजन साळवींचा पक्षप्रवेश करून घेणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Web Title: Will Eknath Shinde get Rajan Salvi to join Shiv Sena without considering the Uday Samant and Kiran Samant brothers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.