कायद्यान लढा देणार - छगन भुजबळ
By admin | Published: June 16, 2015 05:42 PM2015-06-16T17:42:52+5:302015-06-16T18:00:08+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय व घरांवर छापे मारल्यानंतर अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळ यांनी आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालय व घरांवर छापे मारल्यानंतर अडचणीत सापडलेल्या छगन भुजबळ यांनी आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे स्पष्ट केले. ' मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नसून मी कोणालाही घाबरत नाही' असेही त्यांनी म्हटले आहे. कोणताही निर्णय आपण एकट्याने घेतला नसून कोणताही गैरप्रकार केला नसल्याचे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर तसेच त्यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले. महाराष्ट्र सदनच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, या प्रकरणी एकूण १७ जणांवर छापे टाकण्यात आले होते त्याच मालिकेत आता भुजबळ यांची भर पडली.
मात्र ' आपण कोणातीही चूक केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुणालाही एक इंचाची जागा गैर मार्गाने दिली नसून प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणेपुढे नियमांनुसारच काम केले आहे. अनेकदा अनेक खात्यातील वरीष्ठ अधिका-यांनी त्यात बदल सुचवले व काहीवेळा काही प्रस्ताव नामंजूरही केले होते. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही' असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही घरं फक्त माझी एकट्याची नसून ती माझ्या नातलगांची आहेत असे त्यांनी सांगितले. पक्ष आपल्या पाठीशी असून आपण या प्रकरणी कायदेशीर लढा देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ यांच्यावर मर्जीच्या कंपन्यांना कामे देणे, सरकारची दिशाभूल, खोटे हिशेब व कंत्राट देण्यासाठी पैसे घेणे या प्रकारचे अनेक आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहेत.