एफटीआयचा तिढा सुटणार?
By admin | Published: August 24, 2015 12:43 AM2015-08-24T00:43:01+5:302015-08-24T00:43:01+5:30
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआय) विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय
पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआय) विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीने दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समिती सोमवारी आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे. सकारात्मक चर्चा झाल्यामुळे अहवालाबाबत विद्यार्थी आशावादी आहेत.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली होती. या वेळी त्यांनी नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान, २००८च्या विद्यार्थ्यांचे अर्धवट प्रोजेक्ट, आवारातील सुरक्षाव्यवस्था, संसाधने, करारावर असलेले नोकरदार याविषयी चर्चा केली. (प्रतिनिधी)