शपतविधीला जाणारच ; नाराजीचा प्रश्नच नाही : शिवसेना आमदार भुमरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:02 AM2019-06-16T11:02:58+5:302019-06-16T11:03:47+5:30
दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती.
औरंगाबाद - आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराला मराठवाड्यातील शिवसेना आमदारांचा विरोध असल्याची चर्चेला वेग आला असतानाच, पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. मी शपतविधीला जाणारच आहे. माझा कोणताही विरोध नसल्याचे भुमरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितेले.
दुसऱ्या पक्षातील आलेल्यांना लगेच मंत्रिपद दिले जाते, मात्र निष्ठावंत यांना डावलले जात असल्याने मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार नाराज असून शपतविधीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु होती. यात, चौथ्यांदा पैठणचे आमदार असलेले संदीपान भुमरे यांचे सुद्धा नाव होते. मात्र, त्यांनी ही चर्चा फक्त अफवा असून, मी नेहमीप्रमाणे शपतविधीला जाणार आहे. माझी कोणतेही नाराजी नसल्याचेही भुमरे म्हणाले. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम असल्याचे भुमरे म्हणाले.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याने, शिवसेनेची ताकद कायम ठेवण्यासाठी औरंगाबादला मंत्रिपद मिळावे अशी चर्चा शिवसेनच्या गटात सुरु होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. असे असतानाही मराठवाड्यातील सर्व शिवसनेचे आमदार शपतविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनच्या एका आमदाराने दिली आहे.